डॉ. पूनम नाथानी दयानंद विधी महाविद्यालयाच्याl प्राचार्यपदी रुजू


लातूर: येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाचा पदभार डॉ. पूनम नाथानी यांनी आज, दि. २५ मे २०२५ रोजी स्वीकारला.
दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष मा. श्री अरविंद सोनवणे, मा. श्री ललितभाई शहा, मा. श्री रमेशकुमार राठी, सचिव मा. श्री रमेश बियाणी, कोषाध्यक्ष मा. श्री संजय बोरा, संयुक्त सचिव मा. श्री विशाल लाहोटी, सहसचिव मा. ऍड. श्रीकांत उटगे, मा. श्री. अजिंक्य सोनवणे, महाविद्यालय विकास समिती सदस्य मा. ऍड. श्री आशिष बाजपाई, सीए मा. श्री सुदर्शन भांगडिया यांनी डॉ. नाथानी यांचे अभिनंदन केले आहे. संस्थेने विश्वास व्यक्त केला आहे की त्यांच्या नियुक्तीमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कारभारात अधिक गतिमानता येईल.
डॉ. पूनम नाथानी या विधि शाखेतील एक अनुभवी आणि प्रतिष्ठित प्राध्यापिका आहेत. त्यांनी यापूर्वी विविध शैक्षणिक पदांवर यशस्वीरित्या कार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी विधि क्षेत्रात उत्कृष्ट यश मिळवले आहे. त्यांच्याकडे शिक्षण आणि प्रशासनाचा मोठा अनुभव आहे. त्यांचे प्रशासकीय कौशल्य आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव महाविद्यालयासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
प्राचार्यपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर डॉ. नाथानी यांचे महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट