'अपेक्षांचे ओझे:
एका उच्च शिक्षित तरुणीची कथा'
कथा:
शहरातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अनुपमाचं बालपण अभ्यासात रमलं. तिची हुशारी पाहून आई-वडिलांना तिचं भविष्य खूप उज्ज्वल दिसत होतं. भाऊ बी.कॉम. झाला आणि बँकेत नोकरीला लागला. अनुपमाने इंजिनीअरिंगमध्ये बी.ई. (कॉम्प्युटर) पूर्ण केलं आणि तिला कॅम्पसमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. तिच्या आई-वडिलांना खूप आनंद झाला, आता तिच्यासाठी योग्य वर शोधायला सुरुवात झाली.
त्यांच्या अपेक्षा होत्या की मुलगा चांगला सेटल्ड, इंजिनीयर आणि आयटीमध्ये काम करणारा असावा. (मुलाचे आई-वडील नको, ही त्यांची छुपी अट होती.) सुरुवातीला आलेल्या स्थळात सगळं जुळत होतं. मुलगा एकटा होता, आयटी इंजिनीयर होता, चांगला पगार होता, देखणा होता आणि त्याचे आई-वडील गावी राहत होते. पण अनुपमाच्या आईला मुलाच्या आणि तिच्या वयातलं अंतर (5 वर्ष) जास्त वाटलं, म्हणून त्यांनी नकार दिला.
सुरुवात चांगली झाल्यामुळे त्यांची अपेक्षा आणखी वाढली. 'मुलगी बी.ई. आहे, चांगलं कमावते, तर मुलगा तिच्यापेक्षा जास्त शिकलेला आणि सेटल्ड हवा,' असं तिच्या आईला वाटलं. त्यामुळे त्यांनी एम.ई., एम.टेक. किंवा पीएचडी झालेला मुलगा शोधायला सुरुवात केली. पण अशा मुलांचं वय जास्त होतं, काहीजणांना चष्मा होता, तर काही टक्कल पडलेले होते. चांगले स्थळ असूनही, त्यांच्या अपेक्षांमुळे योग्य जुळत नव्हतं.
अखेर, 'बी.ई.ला बी.ई. चालेल' असं ठरवलं, पण अनुपमाचं पॅकेज वाढलं होतं आणि तिला अनुरूप पगार असलेले स्थळ मिळत नव्हते. मग व्यवसाय करणारे स्थळ आले, पण ते संयुक्त कुटुंबातले होते आणि मुलीला सासू-सासऱ्यांची अडचण नको होती.
अखेर अनुपमा २९ वर्षांची झाली, तिच्या भावाचं लग्न झालं आणि तिला अमेरिकेला प्रोजेक्टसाठी जावं लागलं. परतल्यावर घरात नणंद-भावजयीचे वाद सुरू झाले, त्यामुळे ती पुन्हा काही वर्षं परदेशात राहिली.
आता अनुपमा ३३ वर्षांची झाली होती. स्थळ शोधणं चालूच होतं, पण तिला घटस्फोटित, व्यसनी किंवा काहीतरी समस्या असलेले पुरुष भेटत होते. मग त्यांनी आपल्या अटी कमी केल्या, पण नशिबात नव्हतं. तिच्या आई-वडिलांनी ज्योतिष्यांचे उंबरठे झिजवले, भरपूर पैसे खर्च केले, पण काही उपयोग झाला नाही. अनुपमाने स्वतः जोडीदार निवडायचा प्रयत्न केला, पण तिला जमलं नाही.
आज अनुपमा ४० वर्षांची आहे. तिच्याजवळ स्वतःचं सुंदर घर, गाडी आणि भरपूर पैसे आहेत, पण ती एकटी आहे. तिला प्रेमळ आणि काळजी घेणारं कोणीतरी हवं आहे. तिच्या आई-वडिलांना आता या गोष्टीचा पश्चाताप होतोय.
प्रश्न:
चूक कोणाची?
अनुपमाची?
तिच्या वडिलांची?
तिच्या आईची?
अपेक्षा आणि अटींच्या या खेळात अनेक मुलींचं आयुष्य वाया जात आहे. उच्चशिक्षित कुटुंबांमध्ये हे प्रमाण वाढत आहे.
ज्यांना फक्त मुली आहेत, त्यांनी हे लक्षात ठेवावं की आपण आपल्या मुलींना आयुष्यभर पुरणार नाही. त्यामुळे योग्य वयात लग्न होणं गरजेचं आहे.
लेखक:- अनामिक
कष्ट+परिस्थिती ची जाण=यश
उत्तर द्याहटवा